प्रिय विद्यार्थी, पालक व सहकाऱ्यांनो,
नमस्कार
अमृत वैष्णवी एज्युकेशन अँड वेल्फेअर ट्रस्ट अंतर्गत शताब्दी खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) हे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण तांत्रिक शिक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहे. आमचा उद्देश फक्त प्रमाणपत्र देणे नसून, विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य, शिस्त, उद्योजकता आणि रोजगारक्षमतेचा विकास करणे हा आहे.
आजच्या वेगाने बदलणाऱ्या औद्योगिक जगात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकापुरते ज्ञान न घेता प्रत्यक्ष कामात हाताळणीचे कौशल्य आत्मसात करणे अत्यावश्यक आहे. आमचे अनुभवी शिक्षक, अद्ययावत प्रयोगशाळा व प्रशिक्षण केंद्रे विद्यार्थ्यांना हे सक्षम बनवण्यासाठी सदैव तत्पर आहेत.
मी सर्व विद्यार्थ्यांना आवाहन करतो की, प्रशिक्षण काळात पूर्ण मनोभावे शिक्षण घ्या, शिस्त पाळा व आपल्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करा. तसेच पालक व उद्योगजगताचे सहकार्य आम्हाला नेहमीच मार्गदर्शक ठरत आले आहे, यासाठी मी त्यांचे मन:पूर्वक आभार मानतो.
आपण सर्वांच्या सहकार्याने शताब्दी खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) ही संस्था उत्कृष्टतेच्या दिशेने नवनवीन शिखरे पादाक्रांत करेल, याबद्दल मला पूर्ण विश्वास आहे.
धन्यवाद!
प्रा.ऋषिकेश ज्ञानेश्वर बरकले
प्राचार्य,
शताब्दी खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI)
आगासखिंड,
तालुका सिन्नर जिल्हा नाशिक.
